1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)

ओबीसी आरक्षण सुनावणी आता 28 फेब्रुवारीला होणार

ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजे उद्या कोर्टात यावर सुनावणी पार पडणार होती, मात्र कोर्टाने सुनावणी आता सोमवारी 28 फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर केले आहे. कार्यालयीन कारणामुळे ही सुनावणी पुढे गेली आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अंतरिम रिपोर्टनुसार निवडणुकांना परवानगी द्यावी असा अर्ज राज्य सरकारकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य आता या सुनावणीवर अवलंबून असणार आहे.
 
सर्वोच्च न्यायलयाने 17 डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नसल्याचा आदेश जाहीर केला होता, त्यामुळे महाराष्ट्रातील 105 नगर पंचायतींच्या निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्याची वेळ आली होती. परंतु आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसींसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातील असल्याचे गृहीत धरण्यात यावे असा आदेश कोर्टाने जाहीर केला.