शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (23:17 IST)

देशातील सर्वात अनोखे गाव, प्रत्येक घरात साप पाळले जातात

भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. येथील गावांचे सौंदर्य आणि त्यांचे वेगळेपण कधी कधी लोकांना थक्क करून टाकते.
महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 200 किमी अंतरावर सोलापूर जिल्ह्यात एक गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप पाळले जातात. एवढेच नाही तर या गावातील मुले सापांसोबत खेळतात. या गावात बऱ्याच वर्षांपासून सापाची पूजा करतात.म्हणूनच या गावातील प्रत्येक घरात सापाला विशेष महत्त्व आहे. या गावातील लोक सापाला आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळतात. आश्‍चर्याची बाब म्हणजे या गावात आजपर्यंत एकाही व्यक्तीला साप चावला नाही

हे गाव आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ.येथे गावातील  प्रत्येक घरात साप ठेवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर काही घरांमध्ये कोब्राही पाळले जातात आणि हे सर्व साप घरात उपस्थित असलेल्या मुलांसोबत खेळतानाही दिसतात. या गावात साप राहण्यासाठी वारुळे देखील आहेत. इथले हवामान कोरडे असल्यामुळे सापांना राहण्यासाठी हे वातावरण योग्य असते. या गावात पाळीव प्राण्यांप्रमाणे साप घरात फिरत असतात. आजूबाजूच्या या अनोख्या गावातील लोक अनेकदा येथे पोहोचतात आणि हे दृश्य पाहण्यासाठी जातात.

गावात सुमारे 2600 ग्रामस्थ राहत असून या सर्व गावकऱ्यांना आजपर्यंत साप चावलेला नाही आणि याआधी या गावात कोणालाही साप चावला नसल्याचे सांगितले जाते. यासोबतच घरात सापांना राहण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. ही जागा घराच्या छतावर बांधलेली आहे, याला देवस्थान म्हणतात. पूजेचा सण आला की गावातील लोक पूर्ण विधीपूर्वक नागांची पूजा करतात. गावात अनेक नाग मंदिरे आहेत.