शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (21:05 IST)

मराठा बांधवांना अटकाव करु नका-- खासदार संभाजीराजे

मराठा समाजाला आरक्षणसंदर्भात संभाजीराजे मोठी घोषणा करणार होते. त्यांनी टि्वट करत उपोषणाचा निर्णय जाहीर केला तसेच महाराष्ट्रभरातून आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, अशी रोखठोख मागणी केली आहे. आता खासदार संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपुर्वीच पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी उपोषण करण्याचे संकेत दिले होते. गुरुवारी संभाजी राजे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रभरातून आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, अशी रोखठोख मागणी केली आहे.
 
छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, ‘मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती !’ संभाजी राजे यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री वळसे पाटील, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले आहे.