मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (19:14 IST)

नवाब मलिक यांना कोर्टाकडून दिलासा, मान्य केल्या मागण्या

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी ने अटक केली असून त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक झाल्यावर त्यांनी मुबई सत्र न्यायालया कडे काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या मागण्या मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केल्या असून त्यांना दिलासा मिळाला आहे. 

अटक झाल्यावर मलिक म्हणाले की, त्यांना घराचे जेवण मिळावे, तसेच तपासा दरम्यान त्यांचा वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्यांना औषधी साठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होगी. त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्यांच्या मागण्या मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यांचा पुढील मुक्काम ईडीच्या कोठडीत राहणार आहे. त्यांना त्यांच्या मागण्यांनुसार घरचे जेवण दिले जाणार. तसेच तपासणी दरम्यान त्यांचे वकील तिथे उपस्थित राहतील. तसेच त्यांना औषधी देण्यात येणार आहे. कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला आहे