गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (20:53 IST)

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या ‘या’ सुचना

The Chief Minister instructed the administration about the safety of Maharashtrian citizens stranded in Ukraine Marathi Regional News In Webdunia Marathi
रशिया-युक्रेन युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नागरिकांना महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
 
युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरुप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत”, अशी माहिती राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.
 
दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारताने प्रयत्न सुरू केले होते. तर मंगळवारी एअर इंडियाच एक विमान २५० हून अधिक जणांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झाले होते. तसेच आज सकाळी देखील एक विमान युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्ली विमानतळावर दाखल झाले.