शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (21:46 IST)

युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरुन रोहित पवारांची केंद्रावर टीका

देशातील विकासाबाबत काही बोलता येत नसेल तर या मुद्द्याला बगल देण्यासाठी तिसरा मुद्दा रेटणे कोणत्याही देशासाठी घातक असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तर  युक्रेनमध्ये २००० हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. यामध्ये १२०० विद्यार्थी मराठी असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर विद्यार्थ्यांना भारतात आणावे अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरुन रोहित पवारांनी केंद्रावर टीका केली आहे. अहंकाराने पछाडलेल्या हेकेखोर सत्ताधीशाकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा स्वार्थी आणि सामान्य माणसाचं हित खड्ड्यात घालणारा असतो असे रोहित पवार म्हणाले.
 
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, अहंकाराने पछाडलेल्या हेकेखोर सत्ताधीशाकडून घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा स्वार्थी आणि सामान्य माणसाचं हित खड्ड्यात घालणारा असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत असे रोहित पवार म्हणाले आहेत. 
 
तेलाचा भडका उडून महागाई गगनाला भिडेल आणि सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. तसंच हा संघर्ष अधिक चिघळून त्याची व्याप्ती वाढत गेल्यास गरीब आणि विकासनशील देशांना त्यातून सावरणंही अशक्य होऊन बसेल. त्यामुळं हे युद्ध लवकर संपून शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा करूयात. हे युद्ध म्हणजे विकासाबाबत काही बोलता येत नसेल तर या मुद्द्याला बगल देण्यासाठी तिसराच मुद्दा पुढं रेटायचा मग भले तो देशासाठी हानिकारक असला तरी चालेल, असा हा प्रकार आहे. अशा प्रवृत्तीचं राजकारण हे कोणत्याही देशात होत असेल तर ते घातक आणि हानीकारक असतं असे रोहित पवार म्हणाले आहेत.