आम्ही तेव्हा मित्रपक्षाचा धर्म पाळला : आदित्य ठाकरे
शिवसेनेनं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांदरम्यान जोरदार प्रचार सुरू केला आहे.आज शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशच्या काही भागात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये खातं उघडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.“डुंबरियागंजमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. इथल्या तरुणांमध्ये रोष आणि आक्रोष वाढतोय. इथे शिवसेना खातं उघडेल”, असं ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी बाबरी मशीद घटनेनंतर उत्तर प्रदेशात निवडणूक न लढवण्यामागचं कारण सांगितलं. “आम्ही तेव्हा मित्रपक्षाचा धर्म पाळला. त्यांची मतं कमी होऊ नयेत, म्हणून लढलो नाहीत. पण गोवा, उत्तर प्रदेश, मणिपूरमध्ये आम्ही लढणार आहोत”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.