केंद्रीय तपास यंत्रणेची शिवसेने नेते यशवंत जाधव यांच्या घरावर धाड
फोटो साभार सोशल मीडिया(ट्विटर)
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणेने शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घराचे दार ठोठावले आहे. नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात आयोजित आंदोलनात जाधव यांच्या पत्नीचेही सहभाग होते.
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील निवासस्थानावर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकला. सीआरपीएफच्या जवानांसह आयकर विभागाचे अधिकारी आज सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले. सध्या त्याच्या घरी कागदपत्रे तपासली जात आहेत. मात्र, यशवंत जाधव यांची कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यशवंत जाधव गेल्या पाच वर्षांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. निनावी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर आर्थिक गैर व्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते सातत्याने करत आहेत. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाजवळील महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. संजय राऊत यांच्या नंतर शिवसेनेचा आणखी एक नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आल्याने शिवसेनेसाठी हे धक्कादायक आहे.काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने जाधव यांना नोटीस पाठवली होती. आता आयकर विभागाने धाड टाकली आहे. गेल्या तासभरापासून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांचा वर अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात आरोप केले आहे.