शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (23:48 IST)

आदित्य ठाकरे वगळता उद्धव गटातील व्हीपची अवहेलना करणाऱ्या 14 आमदारां विरोधात कारवाई होणार ?

aditya thackeray
महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत सुरू आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सभापतींना पत्र लिहून उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. व्हीपची अवहेलना करणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिल्याचे गोगावले यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर म्हणून त्यांचे (आदित्य ठाकरे यांचे) नाव घेतलेले नाही.
 
रविवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटातील सुनील प्रभू यांच्या जागी शिंदे गटातील भरत गोगावले यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोद  म्हणून  नियुक्ती केली होती. यानंतर गोगावले यांनी सर्व आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होऊन आपल्या बाजूने उभे राहण्याचा व्हीप जारी केला.पण ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटातील 15 आमदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे व्हिप मोडणाऱ्या आमदारांविरोधात शिंदे गटाते प्रतोद भरत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.या आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भरत गोगावले यांनी पत्रात केली आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रात 14 आमदारांची नावं आहेत. त्यातून आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. 
 
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.