शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (21:45 IST)

या बंडाळीमागे मी पुन्हा येईन म्हणणारे तर नाहीत ना : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray twitter
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. व्हॉट्सअपवरील एक मेसेज सांगत गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी स्थिती झाल्याची टीका आदित्य ठाकरे भाजपवर केलीय. तसंच या बंडाळीमागे मी पुन्हा येईन म्हणणारे तर नाहीत ना, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर केलाय.
 
शिवसेनेत असताना त्यांना मान-सन्मान, स्वाभिमान मिळायचा. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला खुर्ची मिळायची. पण आता सूरतला गेल्यावर काय त्यांची अवस्था, हलत आहेत, डुलत आहेत, कशामुळे ते मला माहिती नाही. पण आमदारांना जणू काही कैदी अशाप्रकारे हाताला, मानेला पकडून नेताचे व्हिडीओ समोर आलेत, याचं मला दु:ख वाटतं. महाराष्ट्राचा आमदार सुरतेवरुन गुवाहाटीला जाताना असे हाल होतात, अशी अवस्था होते, यामागे आहे कोण? कुठले अदृश्य हात आहेत का? कुठला दुसरा पक्ष आहे का? जे म्हणतात पुन्हा येईन, पुन्हा येईन ते आहेत. पण त्यांना मला सांगायचं आहे, महाराष्ट्र हरणार नाही, महाराष्ट झुकणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही असे सांगितले.