1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (21:37 IST)

हुश्श.....केतकी चितळेला उर्वरित 21 गुन्ह्यांमधूनही तुर्तास दिलासा

ketki chitale
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला तिच्याविरोधातील उर्वरित 21 गुन्ह्यांमधूनही तुर्तास दिलासा मिळाला आहे. केतकीविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मात्र आज न्यायालयात सरकारने तिला अटक करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आजच्या कोर्टाच्या निकालामुळे केतकीला दिलासा मिळाला आहे.
 
या प्रकरणात कळवा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने एफआयआरमध्ये जामीन मंजूर केला. केतकीला 14 मे रोजी अटक करण्यात आली. यानंतर 40 दिवसांनंतर केतकीची कारागृहातून सुटका झाली. यानंतर तिने गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली होती, या प्रलंबित याचिकेत केतकीने अटकेला आव्हान देणारी आणखी एक याचिका दाखल केली, या दोन्ही याचिकांवर आज न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
 
केतकीविरोधात 22 गुन्हे दाखल असून तिला एका गुन्ह्यातून जामीन मंजुर झाला आहे. परंतु तिच्याविरोधातील 21 विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत ताब्यात घेतले जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी आता न्यायालयाने 12 जुलैला ठेवली आहे. केतकीविरोधात राज्यभरात बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे समाजात तेढ निर्माण करणे अशा अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत.