1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (10:00 IST)

महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू आप्पालाल शेख यांचं निधन

Appalal Sheikh
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीपटूचे मान मिळवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आप्पालाल शेख यांचं खासगी रुग्णालयात किडनी निकामी झाल्यानं निधन झालं.ते किडनीच्या आजारानं ग्रस्त होते.त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या निधनानं कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.त्यांना 1992 साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला.

काही महिन्यापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं निष्पन्न झालं.उपचार करण्यापुरती पैसे देखील त्यांच्या कडे नसे.शेतीवर आणि महाराष्ट्र शासनाकडून त्यांना मानधन मिळत होते.परंतु परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना उपचाराचा खर्च परवडत नव्हता.त्यांनी अनेक कुस्तीपटूंना हरवले होते.राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले.त्यांच्या निधनानं कुस्ती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.