शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (21:10 IST)

अर्जुन देमट्टी यांचे निधन,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता हरपला

शट्टयाप्पा देमट्टी (वय 63) यांचे आज शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात गेली अनेक वर्षे सेवा बजावली होती. सेवानिवृत्त झाल्या नंतर त्यांनी मनपा कर्मचारी संघटना, मनपा कर्मचारी सोसायटी अध्यक्षपदाची धुरा ही सांभाळली होती. बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात अर्जुन देमट्टी यांचा सिंहाचा वाटा होता. बेळगाव परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग असे. बेळगाव परिसरातील आंबेडकर चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. विविध जाती धर्माच्या लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
अर्जुन देमट्टी यांच्या निधना बद्दल बेळगाव परिसरात सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.