गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर गुन्हे दाखल करा: प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव प्रकरणात प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत.  आंबेडकर म्हणतात की  मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनवर जसे गुन्हे दाखल झाले होते, तसेच गुन्हे संभाजी भिडे व  मिलिंद एकबोटेवर गुन्हे दाखल करा मागणी भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर म्हणतात की याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता मात्र  त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली होती. जसे तेथे घडले तोच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे .  म्हणजेच त्यांचं ही कृत्य दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
 
सोबत भीमा कोरेगावमध्ये कोणी हिंसाचार घडवला ते सर्व  मुख्यमंत्र्यांना माहित आहे असे आंबेडकर यांनी सांगितले आणि पुढे म्हणाले की लोकांनी त्यांचे त्यांचे धर्म पाळावे, तुम्ही सांगाल तो धर्म असं चालणार नाही. राज्याला धर्म असू नये. आजच्या बंदमध्ये इच्छेने सहभागी व्हा, कोणावरही जबरदस्ती करु नये. आंदोलकांनी संयम ठेवा, जबरदस्ती नको, शांततेने बंद पाळला जावा, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे.
 
 या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत त्याचं स्वागत आहे आम्ही करतो मात्र चौकशी समितीच्या अध्यक्षस्थानी मागसवर्गीय  न्यायाधीश नको. त्यामुळे सवर्णांवर अन्यायाची भावना होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.