सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:30 IST)

गणेश नाईक यांना अटक करा; रुपाली चाकणकरांचे पोलिसांना निर्देश

ganesh naik
भाजपनेते गणेश नाईक  यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल असल्याने त्यांना अटक करण्याचे निर्देश रुपाली चाकणकरांनी  दिले आहेत.
 
गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. महिलेने केलेल्या तक्रारदाखल पत्रानुसार, गणेश नाईक हे सदर महिलेसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे खळबळजनक आरोप या महिलेने केले आहे. तसेच गणेश नाईक यांच्यापासून त्यांना एक मुलगाही आहे.
 
दरम्यान, सध्या मुलाच्या शिक्षणाच्या व भविष्यासाठी तरतूद म्हणून उपाययोजना करा असा तगादा लावल्याने गणेश नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप संबंधित महिलेने केला आहे. संबंधित पत्र महिलेने राज्य महिला आयोगाला पाठवले आहे.

तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यावर देखील बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्यावर मुंबई महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून त्यांना घेरतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.