शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (14:57 IST)

राज ठाकरे यांना तात्काळ अटक करा, अबू आझमी यांची मागणी

राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम मनसे प्रमुख राज ठाकरे करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केली आहे. जर तसे नाही झाले तर मंदिरात 'हनुमान चालीसा' लावा, असा आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. 
 
त्यानंतर राज्यात भोंग विरुद्ध भोंग असे चित्र दिसून आले. राज्यात धार्मिक तेढ वाढवणारे राज ठाकरे यांना अटक करा, अशी मागणी अबू आझमी यांनी केली. आझमी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केल्याचे आझमी यांनी सांगितले. 
 
लोकशाहीला धोका निर्माण काही लोक करत आहेत. नवी मुंबईत सानपाड़ा सेथे एक जमीन धार्मिक स्थळासाठी दिली आहे. पण लोकल लोक, शिवसेना आणि आरएसएसचे ह लोक विरोध करत आहे. अद्याप सुरक्षा दिली जात नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही सांगितले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.