शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (14:35 IST)

CM साहेब तुम्ही प्रेम केलं का?

uddhav thackeray
हिंगोली- एका प्रेम करणाऱ्या युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा प्रश्न केला आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रेम केलं का? 
 
या पत्रात तरुणांनी म्हटले की खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावं वाटत आहे. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता, माझं कसं काय? विशेष म्हणजे हे पत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
 
हिंगोली जिल्ह्यातील एका युवकाने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. पत्रात युवकानं म्हटलं आहे की, या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं पत्रात म्हटलं आहे.  
 
पत्रामध्ये लिहिलं आहे की, साहेब शेतकरी होऊन प्रेम करणे चुकीचं आहे का? साहेब तुमचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो?  आयुष्यात कधी तरी केलं असेल उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो? मी पण कोणावर तरी प्रेम केलं होतं पण शेत जमीन कमी असल्याने प्रेमाला विरोध असं असतं का हो? असा सवाल युवकानं पत्रातून केलाय. 
viral letter
त्याने पत्रात लिहिले की, मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील एका तुमचा मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का? असा सवाल त्यानं केला आहे.