1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (08:38 IST)

जळगावात NCP अध्यक्ष खासदार शरद पवारांचे आगमन

sharad panwar
खासदार शरद पवार यांचे गुरुवारी रात्री राजधानी एक्स्प्रेसने जळगाव आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रेल्वे स्टेशनवर झुंबड उडाली होती. कार्यकर्त्यांच्या गर्दीतून नेत्यांना वाट काढून देताना सुरक्षारक्षकांची चांगलीच दमछाक झाली.

राजधानी एक्स्प्रेसचे पाच ते सात मिनिटे उशिराने जळगावला आगमन झाले. खासदार शरद पवार यांच्या स्वागतासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार एकनाथ खडसे, विकास पवार, संजय गरुड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खा. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे एक दिवसीय शिबिर अमळनेरला आहे. स्टेशनवरून जैन हिल्स येथे रवाना होताना खा. शरद पवार, आमदार एकनाथ खडसे, ॲड. रवींद्र पाटील व ग्रंथालय विभागाचे राज्य अध्यक्ष उमेश पाटील हे एका वाहनातून तर बाकीचे नेते दुसऱ्या वाहनातून रवाना झाले. माध्यमांशी त्यांनी संवाद साधला नाही.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor