शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (14:44 IST)

शाळा बंद केली म्हणून 40 विद्यार्थी दप्तर घेऊन12 कि.मी पायी निघाले

anath
इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा बंद केली म्हणून मुले दप्तर घेऊन शुक्रवारी सकाळी 12 कि.मीचा प्रवास करण्यासाठी पायी निघाले आहे. हे विद्यार्थी दुपारी एक ते दीड दरम्यान इगतपुरी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवणार आहे. तालुक्यातील भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्ते पैकी दरेवाडी येथे जिल्हा परिषदेची शाळा 1 ली ते 4 थी पर्यंत शाळा होती. धरणामुळे दरेवाडीचे नवीन जागेत पुनर्वसन केले. मात्र काही कुटुंब त्या जागेत जाण्यासाठी तयार नाही, म्हणून 40 कुटुंबाचे नवीन जागेत पुनर्वसन केले आणि त्या ठिकाणी शाळा सुरू होती. मात्र ती शाळा बंद करण्याचे पत्रच काल शाळेच्या मुख्याध्यापकाला आले आणि काल पासून शाळा बंद केली. मग या मुलांनी आता कोणत्या शाळेत शिक्षण घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत या ठिकाणी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत या सर्व मुलाना त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आज इगतपुरी पंचायत समिती येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यलयात शाळा भरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे.