शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (09:22 IST)

पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जींच्या घरी ED ची धाड, सापडले 20 कोटी रुपये रोख

West Bengal Minister Partha Chatterjee
tweetपश्चिम बंगाल सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी शुक्रवारी  अंमलबजाणी संचालनालयाने (ED) धाड टाकली. या धाडीमध्ये तब्बल 20 कोटी रुपये रोख सापडल्याने खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या रोख रकमेचा फोटो ED ने ट्विट केला आहे. पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन आणि बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्ड भरती घोटाळ्याचं हे प्रकरण आहे.
 

यासंदर्भात तपास करण्यासाठी ही धाड टाकण्यात आली होती, अशी माहिती ED कडून देण्यात आली.
मंत्री पार्थ चॅटर्जी आणि परेश अधिकारी यांच्या घरांवर धाडी टाकण्यात येत असताना ED ने विशेष काळजी घेतली होती. सात-आठ अधिकारी सकाळी साडेआठ वाजता चॅटर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. दुपारी 11 पर्यंत त्यांनी धाडीची प्रक्रिया सुरू होती. यावेळी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान चॅटर्जी यांच्या घराबाहेर तैनात होते.