1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (10:05 IST)

पत्नीने आत्महत्या केली म्हणून जवानाने ऑन ड्युटी स्वत:वर गोळी झाडली

As the wife committed suicide
गडचिरोलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे जेथे चंद्रभूषण जगत हे कार्यरत होते. आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली. ही बातमी समजताच कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषण याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
 
चंद्रभूषण हे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले असून त्यांची पत्नी त्यांच्या गावी राहत होती. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.