1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:24 IST)

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा

Warning of unseasonal rains in the state once again
राज्यात  एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे.मागच्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट आणि वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकरी आणि बागायतदारांचं अतोनात नुकसान झालं आहे. काढणीला आलेली द्राक्ष आणि आंब्याचं मोठं नुकसान झाल्यानं बागायदार हवालदील झाले आहेत. 
 
आता हवामान विभागानं पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत केरळ,माहेमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कोकण गोवा,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.