1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:05 IST)

श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे कोरोनाबाधित

Ashutosh Kale
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे कोरोनाबाधित झाले आहेत.फेसबूकवरुन त्यांनी स्वत:च ही माहिती देत संपर्कात आलेल्यांना सावध केले आहे.त्यामुळे त्यांच्या संपर्कातील काळे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. काळे यांनी रविवारी (दि.१९) त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कातआलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’,अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे काळे समर्थकांमध्ये व संपर्कातील सर्वांचीच धांदल उडाली आहे.
 
गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली.यात काळे यांना अध्यक्ष पदावर संधी मिळाली.17 सप्टेंबरलाच त्यांनी पदभारही स्वीकारला. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल,असेही काळे यांनी म्हटले आहे.