1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (12:14 IST)

छत्तीसगड: माजी मंत्री आणि भाजप नेत्याने गळफास लावून आत्महत्या केली

छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राजिंदर पाल सिंह भाटिया यांचा मृतदेह रविवारी राजनांदगाव जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या घरी लटकलेला आढळला. पोलिसांना संशय आहे की हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते.
 
72 वर्षीय भाटिया यांचा मृतदेह त्यांच्या छुरिया येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली आहे की नाही याबाबत पोलिसांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
 
भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार,भाटिया या वर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूने बाधित आढळले होते आणि बरे झाल्यानंतरही त्यांची प्रकृती बरी नव्हती. मात्र, पोलिसही या प्रकरणाच्या तपासात लावत आहेत.
 
जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार असलेले भाटिया मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री होते. 2013 मध्ये त्यांनी विधानसभेचे तिकीट न मिळाल्याबद्दल पक्षाविरोधात बंड केले आणि राज्य निवडणुकांदरम्यान खुज्जी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अपयशी ठरले. मात्र, नंतर ते पुन्हा पक्षात सामील झाले.
 
राजिंदर पाल सिंह भाटिया यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्यांचा एकुलता एक मुलगा जगजीत सिंह भाटिया यांच्यावर रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.