1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:29 IST)

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; दोन जण जखमी

चार ते पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू  झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. ही घटना सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर  आटकवडे शिवारात रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये अन्य दोन जण जखमी झाले आहेत.अमोल विलास शिंदे  वय-24 रा.ठाणगाव,ता.सिन्नर) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
 
अमोल शिंदे हे चार-पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. वैयक्तिक काम आटोपून दुचाकीवरुन सिन्नर येथून आपल्या मित्रांसोबत ठाणगावकडे निघाले असताना हा अपघात झाला.अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.अमोल शिंदे सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बाजावत होते.ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
 
अपघातात अमोल सोबत आणखी दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथे उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्यू पडलेल्या सैन्य दलातील जवानाचे शवविच्छेदन सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.