रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 19 सप्टेंबर 2021 (17:15 IST)

नक्षलवाद्यांनी शेतकऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली

गडचिरोली येथे हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत सुरजागड गावातील एका शेतकऱ्याची नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली.ही घटना रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली या वेळी शेतकरी झोपले होते.त्यांची पत्नी आणि ते दोघेच घरात होते.मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव सोमाजी चैतू सडमेक असे आहे.नक्षलवाद्यांनी रात्री सोमाजींना झोपलेले असताना उठवले आणि आपल्या सह बाहेर नेले त्यांनी बायकोला घराच्या आतच कोंडून ठेवले आणि बाहेर सोमजीवर गोळ्या झाडल्या आणि त्यांचा मृतदेह मुख्य मार्गावर टाकला.त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिट्ठी सापडली आहे त्यात नक्षलवाद्यांनी जंगल,जमिनीवर फक्त लोकांचा हक्क आहे आणि लोहखाणी प्रकल्पाला आम्ही विरोध करतो तसेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दलांच्या दलाली करणाऱ्या नेत्यांना हाकलून काढण्याबाबतचे सांगितले आहे मयत झालेल्या सोमाजी यांना एक मुलगी आहे.घटनेच्या वेळी ती घरात नसून बाहेरगावी गेली होती.