औरंगाबादेत बर्निंग बस:औरंगाबादेत मध्यरात्री धावत्या बसने पेट घेतला
शहराजवळ असलेल्या एका औद्योगिक वसाहतीच्या पार्किन्स कंपनीची कामगारांची वाहुतक करणाऱ्या एका धावत्या खासगी बस ने पेट घेतला.ही घटना सिडको 2 ते जय भवानी नगर रस्त्यावर घडली.बस चालकाने वेळीच सावध होऊन बस रोखल्याने मोठा अनर्थ टळला बस मधील सर्व कामगारांना काही अनिष्ट होण्यापूर्वीच उतरवून घेतल्या मुळे मोठा अनर्थ टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब वेळीच आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले.हे अग्निकांड इतके भीषण होते की या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,या खासगी कंपनीचे बस चालक दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन येत असताना मध्यरात्री एक वाजता सिडको 2 कडून जयभवानी रस्त्यावर जात असताना त्यांना अचानक बसच्या इंजिन मधून धूर निघताना दिसले.बस चालकाने प्रसंगावधान राखून ताबड्तोब बस कडेला उभी केली.आणि सर्व कामगारांना बस मधून खाली उतरण्यास सांगितले. आग लागलेली बघतात त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाला बोलाविले.तो पर्यंत आगीने जोरदार पेट घेतला आहोत.आणि बघताबघता संपूर्ण बस जळून खाक झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.