रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:15 IST)

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला DGCA चा परवाना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळावरील IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या SPVला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (DGCA) चालन परवाना प्राप्त झाला आहे.
 
यामुळे चिपी विमानतळावरून विमान वाहतूक करण्यासाठी कंपनीला हिरवा झेंडा मिळाला आहे.
 
DGCA ने कंपनीला एरोड्रोम लायसन्स दिलं आहे.त्यामुळे चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल.
 
येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरू होत आहे.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये,मुंबई व त्यानंतर देशातील अनेक वेगवेगळे भाग हवाईमार्गे जोडले जावेत हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.