शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:19 IST)

हुंडा न दिल्याने नाशिकच्या विवाहितेवर पतीकडून अनैसर्गिक अत्याचार

नाशिक लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत टीव्ही, लॅपटॉपवर पो-र्न व्हिडीओ दाखवत तशाप्रकारे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत पीडितेच्या सोशल मीडियावरील अकाउंटचे पासवर्ड मिळवत पीडितेच्या मित्रांना अश्लील मेसेज पाठवले.तसेच पाळत ठेवत चारित्र्यावर संशय घेत छळ केल्याप्रकरणी अमेरिकेतील संशयित पतीसह मुंबई येथे राहणाऱ्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विवाहितेच्या तक्रारीनुसार,लग्नानंतर पती, सासू, सासर,नणंद, जावा, नणंदोई यांनी संगनमत करत लग्नात हुंडा दिला नाही या कारणावरून पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. संशयित पतीने जबरदस्तीने पो-र्न फि ल्म दाखवत त्या प्रमाणे अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत अनैसर्गिक अत्याचार केले.
 
तसेच पीडितेच्या सोशल नेटवर्किंग साइटचा पासवर्ड, आयडी जबरदस्तीने घेऊन त्यावरून पीडितेच्या मित्रांना अश्लील मेसेज पाठवत पाळत ठेवली. याद्वारे चारित्र्यावर संशय घेत शारीरिक मानसिक छळ केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांत दिली. याप्रकरणी संशयित सासरच्या मंडळींविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.