रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (10:46 IST)

प्यायला रात्री नवऱ्याने पाणी मागितले आणि पत्नीने नवरया सोबत केले हे

पती-पत्नीचे वाद कशावरुन कधी होतील  याच काही सांगता येत नाही. सोलापूर येते असाच अफलातून किसा घडला आहे. रात्रीच्या सुमारास झोपेतून उठून पाणी मागितल्यामुळे चिडलेल्या बायकोने नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली आहे. या जबर हल्ल्यात पतीचे डोके फुटले आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडली. पत्नीवर पतीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. 
 
कोरफळे गावात उजेश ठाकरे हा आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहतात. तो नेहमीप्रमाणे जेवणकरुन ते घरातील हॉलमध्ये झोपला होता. त्याची पत्नी आशा आणि मुलगी धनश्री या स्वयंपाक खोलीत दाराला कडी लावून झोपल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास तहान लागल्यामुळे उजेश ठाकरे जागा झाला. पाणी पिण्यासाठी उजेशने स्वयंपाक खोलीचा दरवाजा ठोठावला त्यामुळे पत्नी जागी झाली.
 
झोपेतून पाणी पिण्यासाठी उठवल्याने पत्नीने रागात मी पाणी देणार नाही. तुला कुठे जाऊन प्यायचे आहे तिथे जाऊन पी, असं सांगितले. तसेच स्वयंपाक खोलीतील कुऱ्हाड घेत तिने पती उजेशच्या डोक्यात मारली. त्यामुळे उजेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.