रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (14:55 IST)

चांगल्या झोपेसाठी वापर करा ह्या वास्तू नियमांचा प्रयोग

आजकाल लोक गाढ झोप लागत नाही म्हणून त्रस्त असतात. रात्री बेचैनी जाणवते आणि मन अस्वस्थ राहत. तसेच बर्‍याच वेळा वास्तुदोषामुळे देखील तुम्हाला झोप येण्यात अडचण येते. अशात तुम्हाला काही उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला रात्री गाढ झोप येईल…
 
या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुमच्या बेडरूमच्या वर पाण्याचे कुठले ही स्रोत नको. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो.  
 
काही लोक आपल्या बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक सामान जसे की टीव्ही किंवा कॉम्प्युटर ठेवतात. वास्तूमध्ये याला दोष मानण्यात आले आहे. चुकूनही या वास्तू तुमच्या बेडरूममध्ये ठेवू नका. याचा प्रभाव तुमच्या हसत खेळत जीवनावर देखील पडू शकतो.  
 
आपल्या बेडरूममध्ये बेडकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर तुमचा बेड चुकीच्या दिशेत ठेवला असेल तर याचा वाईट प्रभाव देखील तुमच्या जीवनावर पडू शकतो.  
 
खोलीत पाणी, पडणारे धबधबे किंवा एखाद्या पर्वताचे चित्र नाही लावायला पाहिजे. यामुळे तुम्हाला त्रास संभवतो.