गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (14:59 IST)

वास्तू टिप्स: उशी खाली ठेवा या वस्तू, तुमचे प्रत्येक काम होतील सोपे

बर्‍याच वेळा आमच्या जीवनात सतत अडचणी येत असतात आणि आम्हाला त्या कळत देखील नाही, याचे मुख्य कारण काय आहे? अशात तुम्ही वास्तुशास्त्राचा आधार घेऊ शकता. जर तुम्ही वास्तू शास्त्रात दिलेल्या टिप्स अमलात आणाल तर तुमचे बिघडलेले सर्व काम पूर्ण होतील. तर जाणून घेऊया वास्तू शास्त्रातील काही खास टिप्स....  
अशी मान्यता आहे की जर रात्री झोपताना उशी खाली गीता किंवा सुंदराकांड ठेवून झोपाल तर तुम्हाला गाढ झोप येईल आणि तुम्ही तुमच्या कार्यात प्रगती कराल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवाल.  
वास्तुशास्त्रात मुळ्याचे खास उपाय सांगण्यात आले आहे. जर कोणी व्यक्ती रात्री उशी खाली मुळी ठेवून झोपेल आणि सकाळी त्या मुळ्याला शिवलिंगावर अर्पित करेल तर राहू दोष दूर होण्यास मदत मिळते.  
नवरा बायकोतील संबंध जर चांगले नसतील तर मंगळवारी मुगाची डाळ एखाद्या हिरव्या कपड्यात बांधून झोपताना उशीखाली ठेवावी. दुसर्‍या दिवशी ह्या कपड्याला एखाद्या कन्येला दान करावे किंवा दुर्गा मंदिराजवळ ठेवावे. हा उपाय केल्याने नवर्‍या बायकोतील संबंध सुमधुर होतात आणि तुमच्या प्राप्तीत वाढ होते.  
रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून झोपावे दुसर्‍या दिवशी पहाटे या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावे. यामुळे तुमच्या चेहर्‍यात कांती येईल. उरलेल्या पाण्याला एखाद्या कुंड्यात घालावे.