बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (14:06 IST)

घरातील बिघडलेले कामं होतील सूर्याच्या प्रकाशाने दूर

कलयुगात सूर्य हा असा देवता आहे ज्याचे दर्शन तुम्ही साक्षात करू शकता. अशात जर एखादा व्यक्ती रोज सकाळी सूर्याची पूजा करतो तर त्याला प्रत्येक कामात यश नक्कीच मिळत. तसेच जर कोणाच्या घरात सकाळी सकाळी सूर्याचा प्रकाश येतो तर त्याचे बिघडलेले सर्व काम पूर्ण होतात.   
 
वास्तू शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की ज्या खोलीत सूर्याचा प्रकाश येत नाही, ती खोली ओलसर राहते आणि तेथे बारीक बारीक किडे होऊ लागतात. त्या खोलीत राहणार्‍या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहत नाही.   
 
ज्या घरात सूर्याचा प्रकाश पडतो, त्या घरात राहणार्‍या लोकांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना कामात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. लोक स्तव:ला ऊर्जावान जाणवतात.   
 
एवढंच नव्हे तर खोलीत जर सूर्याचा प्रकाश येत असेल तर घरातील नकारात्मकता संपुष्टात येते. ज्या घरात सूर्य प्रकाश येत नाही त्या लोकांना आरोग्याची नेहमी तक्रार राहते. सांगायचे म्हणजे घरात कृत्रिम प्रकाशाचा उपयोग कमी करायला पाहिजे.   
आपल्या बेडरूममध्ये जास्त कृत्रिम प्रकाशाचा उपयोग नाही करायला पाहिजे. जर शयन कक्षात कमी प्रकाश असला तर त्याने उत्तम झोप येते.