मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

या 7 फुलांमुळे जीवनातील पीडा टळेल, नशीब उघडेल

फुलांच्या सुगंधामुळे संताप मिटून भाग्य उजळतं हे वाचून आश्चर्य वाटत असलं तरी हे सत्य आहे. खरं तर भविष्य आमच्या मेंदूत असतं आणि सुंगध देखील. जर आपल्या विचारातून अडथळा दूर होऊन जातील तर आपलं भाग्य आपोआप उजळेल. तर जाणून घ्या त्या अंगणात असावे अश्या 7 फुलांबद्दल.
 
1. पारिजात
पारिजाताच्या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. पारिजातकाचे फुलं आपल्या जीवनातून ताण दूर करून जीवन आनंदाने भरतात. हे फुले सूर्यास्तानंतर आणि अगदी पहाटेच्या वेळी उमलतात. या वृक्षाच्या स्पर्श मात्रने व्यक्तीचा थकवा दूर होतो. हरिवंशपुराणात या वृक्ष आणि फुलांबद्दल विस्तारपूर्वक माहिती मिळते. लक्ष्मी पूजेसाठी हे फुलं वापरले जातात. ज्या अंगणात पारिजात उमलतात त्या घरात नेहमी शांती आणि समृद्धी वास करते.
 
2. रातराणी
याला चांदणीचे फुलं देखील म्हणतात. सर्वात तीव्र सुगंध वातावरणात पसरविणारी रातराणीचे फुलं रात्री उमगतात. वर्षभरात तीन-चारदा त्याला बहर येतो. दरवेळेस 7 ते 10 दिवसांपर्यंत या फुलांचा दरवळ अंतरापर्यंत पसरत असतो. 
या सुगंधामुळे जीवनातील सर्व संताप नाहीसे होतात. ह्या फुलांपासून अत्तर काढलं जातं. या फुलांचा महिला केसात माळण्यासाठी गजरा तयार करतात. रातराणीचं झाडं 13 फूट लांबीचं असू शकतं. याचे पान साधे, अरुंद चाकू प्रमाणे लांब, गुळगुळीत आणि चमकदार असतात. 
 
3. जाई
जाई सुगंधित असल्यामुळे अंगणाची शोभा वाढवते. जाईचा फुलं पांढरेशुभ्र सुगंधी वासाचे आणि नाजूक दिसणारे फुल असतात. पांढर्‍या रंगाच्या या फुलांच्या सुगंधामुळे मन आणि मेंदूचे सर्व ताण दूर होतात आणि वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळते.
 
4. निशिगंध
निशिगंधाचे फुलं संपूर्ण भारतात आढळतात. मैदानामध्ये एप्रिल ते सप्टेंबर आणि पहाडी भागात जून ते सप्टेंबर महिन्यात फुलं उमगतात. निशिगंधाचे तीन प्रकार असतात. हे फुलं माळा आणि बुके तयार करण्यासाठी वापरले जातात. सजावटीसाठी या फुलांचा वापर होत असून याने अत्तर देखील तयार केलं जातं. या फुलांमध्ये अनेक औषधीय गुण देखील आहेत.
 
5. केवडा
केवडा किंवा केतकी सुगंधित फुल आहे आणि याचं अत्तर उन्हाळ्यात शरीराला शीतल करतं. केवड्याच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीराची जळजळ आणि घामाचा वास दूर होतो. उन्हाळ्यात दररोज केवड्याच्या पाण्याने अंघोळ केल्याने शरीर शीतल राहतं. केवड्याचा वापर अत्तर, पान मसाला, पुष्पगुच्छ, लोशन तंबाखू, केश तेल, उदबत्ती, साबणात सुगंधच्या रूपात केलं जातं. औषध म्हणून केवड्याच्या तेलाचा वापर डोकेदुखी आणि आर्थराइटिक सारख्या आजारामध्ये केलं जातं.
 
6. मधुमालती
लाल, गुलाबी, पांढर्‍या अशा रंगाच्या गुच्छात उमगणारे मधुमालतीचे फुलं खूप सुंदर दिसतात. याच्या सुगंधामुळे जवळपासचं वातावरण दरवळून जातं. जवळपास पूर्ण वर्ष याला फुलं येतात. हे बाल्कनी, गेटपोस्ट, कुंपण, गच्ची, खांब, भितीला कव्हर करण्यासाठी उत्तम बेल आहे. हे फुलं रंग बदलतात. सूर्योदयावेळी फुलं उमगतात तेव्हा पांढर्‍या रंगाचे असतात आणि दुसर्‍या दिवशी तेच फुलं गुलाबी रंगात परिवर्तित होतात आणि तिसर्‍या दिवशी गडद लाल रंगाचे होतात. यात पांढर्‍या रंगाचे लहान फळ देखील लागतात जे नंतर तपकिरी रंगात परिवर्तित होतात. मधुमालतीच्या झाडाच्या प्रत्येक भागाचं आयुर्वेदिक उपचारात वापर केला जातो.
 
7. ब्रह्मकमळ
एक असतं साधं कमळ आणि दुसरं असतं नीलकमळ तर तिसरं असतं ब्रह्मकमळ. हे अत्यंत दुर्लभ असून जिथे हे उमगतात तिथे सुख- समृद्धी आणि शांती राहते. वैद्यांप्रमाणे याच्या पाकळ्यांतून अमृताचे थेंब गळतात. याने कर्करोग सारख्या आजारावर देखील उपचार करता येतो. हे फुल उमगताना बघितल्याने लवकरच इच्छित मनोकामना पूर्ण होते. हे फुल रात्री उमगतं आणि दिवसाला कोमेजून जातं.