बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

दक्षिण- पूर्वीकडे बेडरूम असल्यास हे करा...

दक्षिण-पूर्व अर्थात आग्नेय दिशेत बनलेल्या बेडरूम विषयात अधिकश्या लोकांची शंका असते की या रूममध्ये राहणार्‍यांमध्ये भांडण आणि क्रोधाची प्रवृत्ती वाढते, परंतू नेहमी असे नाही. वास्तूवर लक्ष दिले तर आग्नेयचा शयन कक्षावर चांगला परिणाम होतो.
* पलंगाचा मुख्य भाग दक्षिण अथवा पूर्व दिशेकडे असावा.
* पूर्वी भीतींकडे कपाट किंवा स्टोरेज बनवू नये.
* घरातील स्वयंपाकघर ईशान अर्थात उत्तर-पूर्व किंवा दक्षिण- पश्चिम दिशेत नसावे.
* पलंगाच्या वरील सीलिंग प्लेन असावे.
* गच्चीवरील पाण्याची टाकी आग्नेयमध्ये ठेवू नये. ही पश्चिम दिशेत असल्यास फायदा होईल.
* शयन कक्षाचे फ्लोअरिंग आणि इतर खोलीतील फ्लोअरिंग समतल असावे.
* घरातील पूर्वी दिशेला टच होत असलेले टॉयलेट नसावे.