बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (15:32 IST)

अपुरे बनलेल्या घरात राहणे म्हणजे वास्तुदोषाला निमंत्रण देणे

वास्तू शास्त्र व्यवस्थित नियमांवर चालणारे विज्ञान आहे आणि जर तुम्ही वास्तू नियमानुसार घर बनवले व त्याची साजसज्जा केली तर घरात सुख-शांती आणि संपन्नता कायम राहते. पुढे बघूया वस्तूच्या नियमांबद्दल -

अधुरे बनलेल्या घरात राहणे टाळावे      
बर्‍याच वेळा असे होते की एखाद्या शुभ मुहूर्तामुळे आम्ही घाईगडबडीत अपुरे बनलेल्या घरात शिफ्ट होतो. असे केल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर नवीन घरात प्लास्टर पूर्ण झाले नसेल, विटा भिंतीतून दिसत असतील किंवा पेंट केले नसेल तर हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. त्या घरात नेहमी असंतोष राहतो.

भाड्याच्या घरात ठेवणारी सावधगिरी  
जर तुम्ही भाड्याचे घर घेत असाल तर त्या घरातील भिंती आणि फारश्या तेथे शिफ्ट होण्या अगोदर सुधारून घ्या आणि एकदा पेंट जरूर करवून घ्या. असे केल्याने बर्‍याच मानसिक त्रासांपासून तुमचा बचाव होईल.    

तुटलेल्या टाइल्स देखील नुकसानकारक  
घरात एखादी खोली, किचन किंवा इतर कुठल्या जागेची टाइल्स तुटलेली असेल किंवा फारशांमध्ये भेग पडली असेल तर त्याला लवकर दुरुस्त केले पाहिजे अन्यथा घरात आजारपण येण्याची शक्यता आहे.  

मुख्य द्वार कसे असावे     
घरातील मुख्य द्वार इतर दरांच्या तुलनेत मोठे असायला पाहिजे. मुख्य गेट दोन पल्ल्यांचे असेल तर उत्तम. मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूस खिडक्या नको, नाहीतर घराच्या मालकाला आर्थिक चणचण होण्याची शक्यता असते.

घरात काय ठेवायचे काय नाही   
ज्या घड्याळी बंद असतील त्यांना काढून टाकायला पाहिजे किंवा परत सुरू करून लावायला पाहिजे. तसेच झाड़ूचा वापर केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ठेवावे की कोणाची नजर त्याच्यावर पडायला नको. अशी मान्यता आहे की याचा सरळ संबंध घरातील धन आणि संपत्तीशी असतो.  

आरशाचा वापर  
आरसा घरातील मुख्य दाराला नाही लावायला पाहिजे. तसेच बाथरूमच्या दारासमोर देखील आरसा नको.  

वातावरण पॉझिटिव्ह असायला पाहिजे 
घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी चिनी बॉम्बूचा प्रयोग करू शकता. तसेच आपला आणि आपल्या परिवाराच्या सदस्यांचा  भाग्योदय करण्यासाठी घर किंवा व्यापार स्थळाच्या मुख्य दारावर विंड चाइम आणि चिनी नाणे लावणे लाभदायक ठरू शकते.