शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (09:47 IST)

वास्तूत काही परिवर्तन करून कर्जमुक्त होऊ शकता, जाणून घ्या काय आहे ते....

आजच्या या महागाईच्या काळात लोक कर्जात डुबत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे वास्तुदोष हे आहे. जर तुमच्या जीवनात अनेक संकटे येत असतील आणि त्यामुळे तुम्ही कर्जात बुडले असाल आणि या संकटाने घराची सुख-शांती भंग असेल तर वास्तूत काही परिवर्तन करून कर्जमुक्त होऊ शकता व घराची सुख-शांती परत मिळवू शकता. त्यासाठी खालील दिलेले उपाय करा. 
 
झोपण्याच्या खोलीत उष्टे भांडे ठेवल्याने घरातील महिलेच्या तब्बेतीवर प्रतिकूल परिणाम होतो व क्लेश होतात.
 
शयनकक्षात पाणी किंवा जड वस्तू ठेवणे वर्ज्य आहे.
 
पायरीच्या खाली बसून कोणतेही कार्य करू नये.
 
कुठल्याही दारात अडसर नसावा.
 
प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मीचा अपमान होतो.
 
कोर्ट कचेरीची फाइल मंदिरात ठेवल्याने खटला जिंकण्यास मदत होते.
 
दिवंगतांचे फोटो नेहमी दक्षिणेकडे लावायला पाहिजेत. घरातील घड्याळ मंदगतीने चालत असेल तर गृहस्वामीच्या भाग्यात अडथळा उत्पन्न होतो.
 
पलंग कधीही भिंतीला लागून ठेवू नये. त्याने नवरा-बायकोत भांडणे होतात.
 
घरातील व्यक्ती बर्‍याच दिवसापासून आजारी असेल तर नैऋत्य कोपर्‍यात (दक्षिण-पश्चिम) त्याला झोपवायला पाहिजे. ईशान्य कोपर्‍यात पाणी ठेवल्याने रोगी लवकर बरा होतो.
 
घराच्या प्रवेशद्वारात काळ्या घोड्याची नाल, दुर्गा यंत्र, त्रिशक्ती, आत व बाहेर गणपती किंवा दक्षिणमुखी दारावर हनुमानाचे चित्र किंवा भैरव यंत्र लावून त्याचा फायदा घेऊ शकता. हे लावल्याने भूतबाधा होत नाही.
 
औषध-गोळ्या नेहमी ईशान्य कोपर्‍यात ठेवायला पाहिजे. औषध घेताना तोंडसुद्धा त्याच कोपर्‍यात असावे. त्याने
रोगी लवकर बरा होतो.
 
एखादे घर एस आकारावर असेल तर ते फारच शुभ असते.