मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

देवघरात या दिशेत ठेवा मुरत्या

घरात पूजेला विशेष स्थान प्राप्त असतं. जेव्हा देवघराची गोष्ट निघते तेव्हा सर्वांच लक्ष्य उत्तर पूर्व या दिशेकडे जातं. ज्याला वास्तूच्या भाषेत ईशान कोण म्हणतात. तर जाणून घ्या मंदिर उत्तर पूर्व दिशेला का असावं. आणि देवघरासाठी काही विशेष लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी देखील आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
 
ईशान कोण मध्ये असावं पूजा घर
ईशान कोण या जागेवर देवघर असणे सर्वात शुभ ठरतं. कारण या दिशेचं अधिपती बृहस्पती आहे. त्यांच्या तत्त्वगत स्वभावानुरूप आध्यात्मिक ऊर्जेचा संचार सर्वात जास्त असतं. परिणामस्वरूप या दिशेत बसून पूजा केल्याने देवाप्रती ध्यान आणि समर्पणाची भावना पूर्णपणे असते.
 
या खिडकीमुळे वाढते शुभता
ईशान कोणमध्ये बनलेल्या देवघराची शुभता आणखी तेव्हा वाढून जाते जेव्हा त्याच दिशेला एक खिडकी असेल. ईशान कोणमध्ये खिडकी शुभ आणि चुंबकीय किरणांच्या रूपात देवतांचा प्रवेश द्वार असते.
 
मुरत्याची दिशा
देवघरात देवाच्या मूर्ती स्थापित करताना दिशेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देवी-देवतांच्या मुरत्यांची पाठ नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी, अशाने आपण पूजा करायला बसताना आपलं मुख पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असल्याने शुभ ठरेल.
 
जिन्याखाली नसावं देवघर
देवघर पायर्‍या किंवा जिन्याखाली नसावं. तसेच पूजाघर शौचालय किंवा बाथरूमच्या जवळपास नसावं.
 
भिंतीला चिटकवून ठेवू नये मुरत्या
देवघरात देवी-देवतांच्या मुरत्या कधीही भिंतीला चिटकवून ठेवू नये. मुरत्या नेहमी मंदिराच्या भीतींपासून 2 फिट लांबी वर ठेवाव्या. तसेच पूजा करणार्‍याने देखील भिंतीला चिटकून बसून पूजा करू नये.
 
बीमच्या खाली नसावं पूजा घर
घरातील बीमच्या खाली देवघर नसावं आणि पूजा करण्याने देखील त्याखाली बसून पूजा करू नये. त्याने एकाग्रता भंग होते आणि पूजेचं शुभफल मिळण्याऐवजी आजार होण्याची शक्यता वाढते.
 
का आवश्यक आहे शेण
सध्याच्या काळात मार्बल आणि टाइल्स असल्यामुळे गायीचं शेण लावण्याची परंपरा नाहीशी झाली असली तरी देवघराच्या फरशी शेणाने सारवावी. याने सर्व प्रकाराचे वास्तू दोष दूर होण्यास मदत मिळते.