मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated :मुंबई , शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (17:12 IST)

लंडनमधील श्रीमंत भारतीय घरमालकांच्‍या संख्‍येमध्‍ये ११ टक्‍क्‍यांनी वाढ: नाइट फ्रँक

मेफेयर, बेलग्राविया, हायड पार्क, मेरीलेबोन आणि सेंट जॉन वुड ही सर्वाधिक पसंतीची स्‍थ
श्रीमंत भारतीय ग्राहकांच्‍या प्रोफाइलमध्‍ये अधिकाधिक तरूणांची वाढ
आघाडीची मालमत्‍ता सल्‍लागार नाइट फ्रँकचा नवीन अहवाल लंडन सुपर-प्राइम सेल्‍स मार्केट इनसाइट-विंटर २०१९च्‍या मते लंडन प्रॉपर्टी बाजारपेठ श्रीमंत भारतीयांसाठी पसंतीचे गंतव्‍य ठरत आहे. जून २०१९पर्यंत १२ महिन्‍यांत लंडनच्‍या प्रमुख बाजारपेठांमध्‍ये भारतीय गृहखरेदीदारांच्‍या संख्‍येमध्‍ये वर्षानुवर्षे ११ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आहे.
 
भारतीय गृहखरेदीदरांसाठी पसंतीची प्रमुख ठिकाणे आहेत: मेफेयर, बेलग्राविया, हायड पार्क, मेरीलेबोन आणि सेंट जॉन वुड.
 
युरोपियन सार्वमत आणि ऑक्‍टोबर २०१९ या कालावधीदरम्‍यान लंडनमधील प्रमुख ठिकाणी चलनामध्‍ये जवळपास २० टक्‍क्‍यांची सूट आणि किंमतींमधील बदलामुळे भारतीय ग्राहकांना फायदा झाला आहे.
 
अहवालातून निदर्शनास येते की, श्रीमंत भारतीय ग्राहकांच्‍या प्रोफाइलमध्‍ये तरूणांची वाढ होत आहे. अशा प्रकारचे गुंतवणूकदार लंडन सारख्‍या जगभरातील इतर भागांमध्‍ये वेळ व्‍यतित करण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. लंडनमधील सुपर-प्राइम ग्राहकांचे सरासरी वय कमी होत आहे. या वर्षातील सप्‍टेंबर २०१९ पर्यंत ७३ टक्‍के सुपर-प्राइम ग्राहकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी होते. हे प्रमाण २०१५च्‍या सुरूवातीच्‍या सहामाहीमधील प्रमाणापेक्षा अधिक होते.
 
यंदाच्‍या वर्षाच्‍या सुरूवातीला सादर करण्‍यात आलेल्‍या नाइट फ्रँक वेल्‍थ रिपोर्ट २०१९ नुसार २१ टक्‍के भारतीय यूएचएनडब्‍ल्‍यूआयनी त्‍यांच्‍या स्‍वदेशाबाहेर घरे खरेदी करण्‍याची रूची दाखवली. ज्‍यापैकी ७९ टक्‍के भारतीय आशियाई व जागतिक सरासरीपेक्षा अधिक असलेल्‍या युनायटेड किंग्‍डममध्‍ये (युके) मालमत्‍ता गुंतवणूक करू पाहत आहेत. आशियाई, भारतीय व जागतिक यूएचएनडब्‍ल्‍यूआय गुंतवणूक करू पाहणा-या प्रांतांचे तुलनात्‍मक विश्‍लेषण:

ऑस्‍ट्रेलिया
युनायटेड स्‍टेट्स युनायटे‍ड किंग्‍डम कॅनडा सिंगापूर  
आशियाई यूएचएनडब्‍ल्‍यूआय ४१ टक्‍के ३६ टक्‍के ३२ टक्‍के २७ टक्‍के २० टक्‍के
भारतीय यूएचएनडब्‍ल्‍यूआय १४ टक्‍के ५२ टक्‍के ७९ टक्‍के १० टक्‍के १४ टक्‍के
जागतिक सरासरी १८ टक्‍के ४२ टक्‍के ३२ टक्‍के १३ टक्‍के ४ टक्‍के
स्रोत: वेल्‍थ रिपोर्ट अॅटीट्यूड्स सर्व्‍हे २०१९
ब्रेक्सिटशी संबंधित राजकीय अनिश्चितता या प्रमुख कारणामुळे काही ग्राहक व विक्रेते अजूनही गृहखरेदीच्‍या व्‍यवहारामध्‍ये संकोच करत आहेत. लंडन सुपर-प्राइम सेल्‍स अहवालाने सांगितले की, राजकीय अनिश्चिततांचे निराकरण झाल्‍यानंतर अलिकडील वर्षांमध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या मागणीच्‍या स्‍तराला पुन्‍हा एकदा चालना मिळेल. हा अहवाल सांगतो की, व्‍यवहारामध्‍ये वाढ होण्‍याची स्थिती आहे.
 
नाइट फ्रँक इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजल म्‍हणाले, ''आर्थिक व राजकीय महत्‍त्‍वामुळे लंडन हे नेहमीच भारतीय गुंतवणूकदारांसाठी प्रमुख ठिकण राहिले आहे. अलिकडील राजकीय व आर्थिक विकासांखेरीज बाजारपेठेसाठी दीर्घकालीन आर्थिक तत्‍त्‍वे प्रबळ राहिली आहेत. ज्‍यामुळे देशाबाहेर मालमत्‍ता खरेदी करू पाहणा-या भारतीयांमध्‍ये या ठिकाणाबाबत रूची निर्माण झाली आहे. भारतीय बाजारपेठांमधील गुंतवणूकांच्‍या तुलनेत भांडवल व भाडेतत्‍त्‍वासाठी उत्‍पन्‍न उच्‍च राहिले आहे. स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये मंदी असल्‍यामुळे आम्‍ही भारतीयांकडून लंडन सारख्‍या परिपक्‍व बाजारपेठेमध्‍ये गुंतवणूक होण्‍याच्‍या प्रमाणाला चालना मिळण्‍याची अपेक्षा करतो. या बाजारपेठा कमी कालावधीसाठी उच्‍च परतावे देतात.''
 
नाइट फ्रँक प्रायव्‍हेट ऑफिस आणि भारतातील नाइट फ्रँकचे अॅम्‍बेसेडर अलास्‍डैर प्रिचर्ड म्‍हणाले, ''लंडन ही श्रीमंत भारतीय ग्राहकांसाठी नेहमीच एक लक्षवेधक बाजारपेठ राहिल. अनेकांची या बाजारपेठेप्रती आवड निर्माण झाली आहे. ही बाजारपेठ इतिहास, संस्‍कृती व उत्‍तम जीवनशैलीचा आनंद देते. अनेकजण त्‍यांच्‍या मुलांना शिक्षणासाठी युकेमध्‍ये पाठवतात. त्‍यासोबतच मालमत्‍तेमध्‍ये गुंतवणूक देखील करतात.''
 
प्रिचर्ड पुढे म्‍हणाले, ''सध्‍या भारतीय भांडवल बाजारपेठेमध्‍ये मंदीचे वातावरण असल्‍यामुळे अनेकांनी मालमत्‍ता खरेदीवर मर्यादा ठेवली आहे. तरीदेखील जून २०१९ पर्यंतच्‍या १२ महिन्‍यांमध्‍ये मागील वर्षातील १२ महिन्‍यांच्‍या तुलनेत लंडनच्‍या प्रमुख बाजारपेठेमध्‍ये मालमत्‍ता खरेदी करणा-या भारतीय ग्राहकांमध्‍ये ११ टक्‍क्‍यांची वाढ दिसून आली आहे. या ग्राहकांमध्‍ये मेफेयर, बेलग्राविया, हायड पार्क, मेरीलेबोन आणि सेंट जॉन वुड ही ठिकाणे पसंतीची ठरली आहेत. भारतीय ग्राहकांमध्‍ये दिसण्‍यात आलेला प्रमुख ट्रेण्‍ड म्‍हणजे श्रीमंत कुटुंबांच्‍या तरूण पिढीच्‍या माध्‍यमातून गुंतवणूकदारांमध्‍ये तरूण पिढीची वाढ होत आहे. ते लंडन, युएस व दुबई सारख्‍या जगातील इतर भागांमध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी उत्‍सुक आहेत.''
 
सुपर-प्राइम प्रॉपर्टीजच्‍या बाबतीत किंवा १० दशलक्ष युरो दशलक्षवर घरांच्‍या किंमती असण्‍यासंदर्भात जागतिक ग्राहकांनी वर्षातील मे २०१९ पर्यंत लंडनमध्‍ये एकूण २.०६ बिलियन युरो खर्च केले. हे प्रमाण मागील १२ महिन्‍यांतील २.०५ बिलियन युरोच्‍या आकडेवारीपेक्षा काहीसे अधिक आहे. उच्‍च संपत्‍ती असलेले व्‍यक्‍ती कमी झालेल्‍या पाऊंड किंमतीचा लाभ घेतात.
 
अहवालाच्‍या मते, अनिश्चित राजकीय पार्श्‍वभूमीमुळे मागणीमध्‍ये घट झाल्‍यामुळे एकूण व्‍यवहार आकारमान १३ टक्‍क्‍यांनी कमी होऊन १२० वरून १०४ वर पोहोचला.