मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (09:56 IST)

चित्रपटात सर्वांच्या सहयोगानंच भारतीयत्व जपता येईल

गीतकार सुधाकर शर्मा 
 
आजच्या चित्रपटात सर्वांच्या सहयोगानंच भारतीयत्व जपता येईल, असं प्रसिद्ध गीतकार, लेखक सुधाकर शर्मा यांनी सांगितलं. संस्कार भारती चित्रपट विभाग आयोजित "ह्रषिदा स्मृति "कार्यक्रमात मालाड इथं बोलत होते. ह्रषिदांच्या संदर्भातील अनेक आठवणी त्यांनी कथन केल्या. त्यांच्यात सक्षमता, समर्थता होती कारण त्यांनी भारतीयत्व जपलं.. असंही त्यांनी सांगितलं.
 
या कार्यक्रमाला संस्कार भारती कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रसिद्ध अभिनेता सुनील बर्वे, महामंत्री संजय गोडसे, अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजित गोखले, कोषाध्यक्ष  रविंद्र फडणीस,चित्रपट विभाग कार्यक्रम  संयोजक ललितेश झा, जगदीश निषाद,संजय थवि, सुरेन्द्र कुलकर्णी, अभिनेत्री मैथिली जावकर आणि हिंदी, मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन चित्रपट विभाग उपाध्यक्ष अरुण शेखर यांनी केलं.
 
चित्रपट जगतात ह्रषिकेश मुखर्जी यांचं योगदान अतुलनीय असून त्यांनी भारतीय सांस्कृतिक तसंच कौटुंबिक व्यवस्था विविध कथातून जिवंत ठेवलं, असे गौरवोद्गार डाॅ.अनुराधा सिंग यांनी यावेळी बोलताना काढले.. अनुराधा सिंग यांनी ह्रषिदांच्या चित्रपटावर पीएचडी केली आहे.
 
लेखक, गीतकार अभिलेश यांनीही मनोगत व्यक्त केलं.
यानंतर राजश्री शिर्के आणि नर्तकांनी देवी स्तुती, रावण-मंदोदरी संवाद-भावनृत्य सादर झालं. अभिनेत्री कल्याणी कुमारी यांचा नृत्याविष्कार तसंच संस्कार भारती, बोरिवली समितीने लघुनाट्य सादर केलं. आभार प्रदर्शन जितेंद्र यांनी केलं.