शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

आपण वापरत असाल credit card, तर लक्षात ठेवण्यासारख्या 10 गोष्टी

अनेक लोकं क्रेडिट कार्ड (credit card) इश्यू तर करवून घेतात परंतू त्यावर लागणारे चार्जेस आणि इतर महत्त्वाची माहिती नसल्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं. कार्ड घेण्यापूर्वी या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे-
 
1. Credit card वर आपल्याला वार्षिक चार्ज किती लागणार हे माहीत असलं पाहिजे. बँकांकडून लिमिट वाढवण्यासंबंधी मेसेज येतात त्यावर वार्षिक चार्ज किती वाढेल हे माहीत करून घ्यावं.
 
2. आपण क्रेडिट कार्ड इश्यू केले आणि वापरत नसाल तरी वार्षिक शुल्क भरावा लागतो.
 
3. आपल्याला क्रेडिट कार्ड बिलाचे भुगतान वेळेवर केले पाहिजे. जर आपण शेवटल्या तारखेपर्यंत भुगतान केले नाही तर चांगलीच पेनल्टी द्यावी लागू शकते. कोणत्याही कारणामुळे बिल अधिक झाले असल्यास सेटलमेंटचा विचार न करता पूर्ण भुगतान करणे योग्य ठरेल.
 
4. क्रेडिट कार्डावर ऑटो पेमेंट फीचर विचारपूर्वक वापरावं. आपल्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास आपल्याला आर्थिक नुकसान झेलावं लागू शकतं.
 
5. क्रेडिट कार्ड आपल्या बँकेद्वारे प्रदान केलेली सुविधा आहे. याचा वापर स्वत: करावं. आपल्या नातलग किंवा मित्रांसोबत पासवर्ड शेअर करण्याची चूक मुळीच करू नये.
 
6. जर आपल्या क्रेडिट कार्डाने चुकीचं किंवा फ्रॉड ट्रांझेक्शन झालं असल्यास याबद्दल बँकेला लगेच कळवावं आणि कार्ड लगेच ब्लॉक करावं.
 
7. क्रेडिट कार्डाने खरेदी केल्यावर मिळणारे बंपर डिस्काउंट आणि रिवॉर्ड प्वाईंट प्रत्येकाला सहजच आकर्षित करतात. अशात अनेकदा व्यक्ती गरज नसताना ही सामान खरेदी करतो आणि बिल वाढतं.
 
8. जर आपण क्रेडिट कार्ड बिलाचं भुगतान करण्यात सक्षम असाल तर किमान मिनिमम ड्यू भरावे. मिनिमम ड्यू भुगतान केल्यावरही आपल्याला फायनेंशियल चार्जेसचा भुगतान करावा लागणार परंतू बिलाचे काहीच भुगतान न करण्याच्या अपेक्षाकृत कमी असेल.
 
9. क्रेडिट कार्ड बिल अधिक असल्यावर संयमाने घ्या. योग्य प्लानिंग करा. लक्ष्य निर्धारित करुन योग्य पद्धतीने भुगतान करत राहिला तर लवकरच समस्येपासून सुटका मिळेल.
 
10. जर आपण क्रेडिट कार्डाने महागडी वस्तू खरेदी केली असेल तर लगेच त्याची ईएमआय करवणे योग्य ठरेल. नंतर ईएमआय भुगतान वेळेवर करत राहावे, या प्रकारे भुगतान होईल आणि अतिरिक्त व्याज आणि चार्जेसपासून मुक्ती देखील मिळेल.