शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (12:38 IST)

आयटीएमच्या विद्यार्थ्यांनी समुद्रकिनार्‍यावर राबविले स्वच्छता अभियान

आयटीएम बिझिनेस स्कूलने पर्यावरण रक्षणासाठी जागरूकता पसरवण्याचे काम केले.
 
मुंबई, दि पॅशनेट इको क्लबचे सदस्य आणि आयटीएम बिझनेस स्कूल, खारघर येथील विद्यार्थी शिवाजी पार्क आणि गिरगाव चौपाटी येथील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी ‘क्लीन मुंबई, ग्रीन मुंबई या उद्दिष्टासह एकत्र आले. 
 
शिवाजी पार्क आणि गिरगाव चौपाटी परिसर ही मुंबईतील अशी महत्वाची ठिकाणे आहेत, जी गणेश विसर्जनानंतर अस्वच्छ होतात. आयटीएम खारघरच्या इको क्लबचे विद्यार्थी गेल्या ६ वर्षांपासून दरवर्षी येथे स्वच्छता मोहीम राबवित आहेत, स्वच्छता जनजागृती आणि लोकांना योग्य पद्धतींचे प्रदर्शन करून पर्यावरण संरक्षणासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतात.
 
झाडू आणि ग्लोव्ह्जसह विद्यार्थी एकत्र येऊन शिवाजी पार्क बीचवर २.५ कि.मी. लांब आणि गिरगाव चौपाटी ४ कि.मी. लांबीची स्वच्छता केली. दोन तासांत, समुद्रकिनार्‍यावरील कचरा संकलनात सुमारे १९० बॅग भरल्या गेल्या.
 
यावर बोलताना आयटीएम बिझिनेस स्कूलच्या मार्केटिंग, एचओडी - प्रा. प्राची गुप्ता म्हणाल्या, “आयटीएमच्या विद्यार्थ्यांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेणे आणि पर्यावरणाची काळजी जाणून घेणे नेहमीच अभिमानास्पद असते. विद्यार्थ्यांच्या अशा कल्पना आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अशा सामाजिक कामासाठी आम्हाला मदत करण्यास मदत करणाऱ्या महानगरपालिकेचे मनःपूर्वक आभार ”
विद्यार्थ्यांनी जवळच्या रहिवाशांना तसेच मुंबईकरांनाही प्लास्टिकपासून मुक्त व्हावे आणि पर्यावरणपूरक व्हावे, असे आवाहन केले. मुंबईचे नागरिक म्हणून विसर्जन करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात पण फुले, सजावट, प्लास्टिक इत्यादींचा उरलेला कचरा गोळा करण्यात लोक अपयशी ठरतात, या हेतूने आम्ही स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाविषयी जागरूकता पसरविण्याचे उद्दीष्ट ठेवले. 
 
या उपक्रमामुळे समुद्रकिनार्‍याचा चेहरा बदलण्यास मदत झाली, जे खूप लोकप्रिय आहे. स्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना हे समजण्यास देखील मदत झाली की कचरा व्यवस्थापन आणि योग्य कचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे समुद्रकिनारे आणि सागरी प्रजातींवर कसा परिणाम होतो.