शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (16:24 IST)

रशियात होणार अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य संमेलन

मुंबई युनिव्हर्सिटी, मास्कोतील पुश्किन युनिव्हर्सिटी व एम जी डी ग्रुप ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेचे आयोजन रशियातील पुश्किन विद्यापीठ, मास्को येथे करण्यात आली आहे. सोमवार दि.16 व मंगळवार दि. 17 सप्टेंबर या कालावधीत आयोजित जन्मशताब्दी सोहळ्या दरम्यान रशिया येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे दोन पुतळे देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष शेजवळ यांनी दिली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यासाठी देशभरातून 350 भारतीय बांधव रशियातील पुश्किन विद्यापीठाकडे मार्गस्थ झाले आहेत. नाशिक शहरातून रशियाकडे निघालेल्या या प्रतिनिधींमध्ये शैक्षणिक, सामाजिक, शासकीय, निमशासकीय, सेवानिवृत्त, कवी, लेखक, विचारवंत या विविध क्षेत्रातील साहेबराव खरात, भगवान भोगे, शकुंतला खरात, डॉ. सुरेश कांबळे, सुभाष पवार, अशोक पवार, उत्तम अहिरे, प्रशांत साळवे यांसह विविध क्षेत्रातील एकूण तीस मान्यवरांचा सहभाग आहे.
 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेसाठी वरील सर्व भारतीय समाज बांधवांना शनिवार (दि14) रोजी त्र्यंबक रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक सुभाष शेजवळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब शिरसाठ आदींसह नागरिक उपस्थित होते.