1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (18:16 IST)

21 व्या वर्षी यूपीएससी मध्ये यश मिळवून देशातील सर्वात लहान आयपीएस बनली

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती न कोणती स्वप्न असतात. आपल्या लक्ष्याला साध्य करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. कोणी डॉक्टर बनण्यासाठी, किंवा सैन्यामध्ये जाण्यासाठी असो आपापल्यापरी मेहनत करत असतात. यूपीएससी परीक्षा देऊन त्यात यश मिळवण्यासाठी काही जण आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष देतात. यश मिळे पर्यंत ते प्रयत्न करतात.  मात्र त्यात काहीच लोकांना यश मिळते. अशाच एक आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी युपीएसी च्या परीक्षेत यश मिळवणारी लातूरची नीतिशा जगताप हिचे कौतुक करण्यासारखे आहे. मूळची लातूरच्या या कन्येने पहिल्याच प्रयत्नात युपीएसीच्या परीक्षेत 199 वी रँक आणून यश मिळवले. एवढेच नाही तर ती आता फक्त 21 वर्षाची असून देशातील सर्वात लहान आयपीएस बनण्याचा मान देखील मिळवला आहे. 

यूपीएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला असून त्यात महाराष्ट्राचे 100 हुन अधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या परीक्षेत बिहारच्या शुभम कुमार ने देशात प्रथम स्थान पटकवला असून महाराष्ट्र राज्यातून मृणाल जोशी हिने प्रथम स्थानी तर विनायक नरवाडे हे द्वितीय स्थानी आहे. या दोघांचे क्रमांक यूपीएससीच्या गुणवत्ता यादीत 36 आणि 37 वा क्रमांक आहे.  त्यात नीतिशाने 199 वी रँक आणूंन यश संपादन केलं आहे. नीतिशा जगताप हिने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातुन सायकोलॉजी विषयात पदवी मिळवली आहे. ती अभ्यासात मुळातच हुशार असून कधी ही तिच्यावर अभ्यास कर असं म्हणायची वेळच आली नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. तिने यूपीएससीच्या परीक्षेसाठी पदवीच्या दुसऱ्या वर्षी पासून तयारी सुरु केल्याचे सांगितले. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.