सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 15 मार्च 2022 (15:13 IST)

छेड काढणाऱ्यांना मुलींनी धू धू धुतलं

रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी एका रोड रोमिओला धू धू धुतलं. ही घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात घडली. येथे काही विद्यार्थिनींनी एका रोड रोमिओला चांगली अद्दल घडवली आहे.
 
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही विद्यार्थिंनी आरोपीला तरुणाला भररस्त्यात चप्पलेनं मारहाण करताना दिसत आहे. 
 
माहितीनुसार संबंधित घटना येवती येथील असून रोजच्या त्रासाला कंटाळून येथील मुलींनी भररस्त्यात आरोपीला बेदम चोप दिला आहे. दरम्यान आरोपी हात जोडून माफी मागताना दिसत आहे. यावेळी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली आणि गर्दीतील काही लोकांनी देखील आरोपीला मारहाण केल्याचं समजतं.
 
मागील काही दिवसांपासून एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा-महाविद्यालयात जावं लागत आहे. अशात येवती येथील काही विद्यार्थिनी देखील पायपीट करत शाळा महाविद्यालयात जात असताना एक तरुण मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनींचा पाठलाग करत होता. समजून देखील त्याने ऐकले नाही तेव्हा संबंधित मुलींनीच आरोपीला चांगलाच चोप दिला आहे.