रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2019 (16:23 IST)

आता एटीएम फोडी नाही तर एटीएम मशीनची चोरी

पुण्याजवळील यवल येथील पुणे- सोलापूर महामार्गच्या कडेला असणारे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन शनिवारी मध्यरात्री १ वाजनांच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेले असल्याची घटना घडली आहे. या एटीएम केंद्रामधून सुमारे ३० लाख रुपयांची रोकड चोरीला गेली असल्याची प्राथमिक माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. चोरट्यांनी एटीएम केंद्रामधील संपूर्ण मशीनच पळवून नेले असल्‍याची घटना घडली आहे. चोरट्‍यांचा हा प्रकार सीसीटीव्‍हीत कैद झाला आहे. दुसरीकडे संगमनेर शहरातील गुंजाळवाडी परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी पळवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी एटीएममधील 17 लाख रुपयांसह मशीन पळवलं. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी वडगाव पान गावातील बँक ऑफ बडोदाचं एटीएमही फोडण्याचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी संगमनेरातील बँक ऑफ महाराष्ट्रचं एटीएम पळवून नेलं.