गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2024 (20:16 IST)

एटीएसने मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशींना अटक केली

arrest
महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून चार बांगलादेशींना अटक केली आहे. हे सर्वजण बनावट कागदपत्रांद्वारे अनेक दिवसांपासून मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते. या चार बांगलादेशींचा एक साथीदार बनावट भारतीय कागदपत्रांद्वारे सौदी अरेबियात पळून गेला
 
असे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. यावेळी आरोपींनी लोकसभा निवडणुकीतही याच बनावट पासपोर्टचा वापर करून मतदान केल्याचे तपासात समोर आले आहे. 
 
आरोपींकडून बनावट मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. काही बांगलादेशी नागरिक भारतीय नागरिकांचा आव आणून बनावट पासपोर्ट वापरून परदेशात काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एटीएस अजूनही पाच जणांचा शोध घेत आहे. अटक केलेल्या बांगलादेशींच्या संगनमताची माहिती महाराष्ट्र एटीएस काढत आहे. 
 
या प्रकरणी एटीएसने आयपीसीच्या कलम 465, 468, 471, 34 आणि भारतीय पासपोर्ट कायद्याच्या कलम 12 (1ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
 
बनावट कागदपत्रे बनवून ते मुंबईत राहत होते. या प्रकरणात आणखी पाच बांगलादेशींची ओळख पटली आहे. सर्वजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे अवैध बांगलादेशी गुजरातमधील सुरत येथून भारतीय नागरिक म्हणून बनावट कागदपत्रे बनवून मुंबईत राहत होते. उर्वरित पाच फरारांपैकी एक बांगलादेशी भारतातून बनावट कागदपत्रे बनवून सौदी अरेबियात गेल्याचे उघड झाले आहे.

Edited by - Priya Dixit