गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:27 IST)

नवाब मलिकांकडून सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न – आशिष शेलार

Attempt by Nawab Malik to hang a common man - Ashish Shelar नवाब मलिकांकडून सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न – आशिष शेलारMaharashtra news Regional Marathi News  in Webdunia Marathi
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलीक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार  यांनी चढवला.
 
आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन वर्ष तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्या पक्षाकडं गृहमंत्रिपद आहे. हाजी अराफत किंवा हाजी हैदर यांच्यावर एनसीसुद्धा नोंद करु शकला नाहीत. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा आहे, असं आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिक यांच्या आरोपाप्रमाणं बनावट नोटा प्रकरणातील आलम शेख हा काँग्रेसचा सचिव होता. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वत: पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या दोन वर्षात बांगलादेश सोडा मंबईत कुठंही गुन्हा केल्याचं प्रकरण नाही. सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला.