सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (15:40 IST)

अमृता फडणवीसांच्या ‘बिगडे नवाब’ ट्विटला नवाब मलिकांची मुलगी निलोफरनं दिलं उत्तर, म्हणाल्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या ड्रग्स आणि अंडरवर्ल्ड संबंधावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस  यांनी मलिक यांना ‘बिगडे नबाव’ म्हटलं. त्यांच्या ट्विटला मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी उत्तर दिलं आहे. निलोफर मलिक यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
 
काय म्हटले अमृता फडणवीसांनी?
 
काल अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना ‘बिगडे नवाब’ म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांचं लक्ष्य आहे, अशी टीका त्यांनी केली.

निलोफर मलिक यांचे प्रत्युत्तर
अमृता फडणवीस याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक म्हणाल्या, कापाट मध्ये लपवलेले सांगाडे  नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे, असं निलोफर मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
दरम्यान नवाब मलिक यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी ड्रग्सशी संबंधीत असलेल्या एका व्यक्तीसोबत उभ्या असलेल्या अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.