शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (12:04 IST)

साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. या महिलेने आपल्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने साताऱ्यातील पीडित नलावडे कुटुंबातील   या महिलेला वाचविण्यात यश आले आहे. 
 
या महिलेने दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक फसवणूक प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही या वरून स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.